अपत्तीग्रस्तांचे हाल पाहून शर्मिला ठाकरे झाल्या भावूक, अश्रू झाले अनावर

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.

Loading...

याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्या सर्वप्रथम सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ या गावाला भेट दिली. त्यानंतर त्या सांगली शहरातील पुरग्रस्तांशी भेटून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर मिरज शहरालाही भेट दिली. आपत्तीग्रस्त गावांना भेट देताना शर्मिला ठाकरे भावूक झाल्या. व आपत्तीग्रास्तांचे हाल पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे हेही पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं जाहीर केले होते. तसेच त्यांनी फोनवरुन पुरग्रस्तांची विचारपूस करून पिडितांना धीर दिला होता. तसेच लवकरात लवकर मी तुम्हाला भेटायला येतो असं आश्वासन दिले होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी तयार आहे. पूरग्रस्त बाधित गावांना जी मदत लागेल ती मदत आम्ही करू असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.Loading…


Loading…

Loading...