‘लावणी नृत्य’ राज्यस्तरीय स्पर्धेत शर्लिन चित्रकार ठरल्या महाराष्ट्राच्या ‘लावणी क्वीन’

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे मराठी लावणी नृत्याची राज्यस्तरीय सोलो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक फेरी , १४ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडले.

युवा गटात पहिला क्रमांक भैरवी मिस्त्री ला मिळाला तर खुल्या गटात रशियाच्या शर्लिन चित्रकार या युवतीने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच या कार्यक्रमात सिद्धेश्वर झाडबुके यांची राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

Loading...

लावणी सम्राज्ञी,नृत्यांगनांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार –

लीला गांधी, सुहासिनी देशपांडे,गुलाबबाई संगमनेरकर,जयमाला इनामदार,अप्सरा जळगावकर,बरखा जळगावकर,छाया खुटेगावकर,माया खुटेगावकर,रेश्मा परितेकर,चैत्राली राजे,सुवर्णा काळे, पूजा पवार, अलका जगताप,सुरेखा कुडची ,अर्चना जावळेकर या लावणी सम्राज्ञी ,नृत्यांगनांचा सत्कार यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आला .

या कार्यक्रमाला  राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील,पुणे शहराध्यक्ष प्रमोद रणनवरे , मेघराज राजेभोसले, रवींद्र माळवदकर, काका चव्हाण, इक्बाल दरबार उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्रपट व सांस्कृतिक विभाग आयोजित लावणी नृत्य राज्यस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण

युवा गट आणि खुला गट अशा विभागात ही स्पर्धा झाली . दोन्ही गटातील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकास सोन्याची नथ,पैठणी आणि रोख २५ हजार पारितोषिक देण्यात आली. खुल्या गटातील द्वितीय क्रमांकास २० हजार आणि पैठणी ,तृतीय क्रमांकास १५ हजार आणि पैठणी असे पारितोषिक देण्यात आले. दोन स्पर्धकास उत्तेजनार्थ पारितोषिक ३ हजार आणि पैठणी असे होते . युवा गटातील द्वितीय क्रमांकास १५ हजार आणि पैठणी,तृतीय क्रमांकास १० हजार आणि पैठणी असे पारितोषिक देण्यात आले . युवा गटात दोन स्पर्धकास उत्तेजनार्थ पारितोषिक ३ हजार आणि पैठणी असे होते .

स्पर्धेची प्राथमिक फेरी निघोजकर हॉल(भिडे पुलाजवळ,नारायण पेठ) येथे १० फेब्रुवारी रोजी झाली . या लावणी स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून नांदेड ,नागपूर ,यवतमाळ, औरंगाबाद ,अहमदनगर, सिंधुदुर्ग ,रायगड ,मुंबई, ठाणे, उस्मानाबाद ,लातूर, पंढरपूर, अकोला, अमरावती, येथून १५० च्या वर स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला .या स्पर्धेमध्ये मुलींबरोबर तृतीयपंथीयांना देखील इतर स्पर्धकांना बरोबर समान व्यासपीठ देण्याचे काम राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाने केले , २५ तृतीय पंथीयांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. या कार्यक्रमाचे शकुंतला नगरकर, अनिल सुतार, आशिष पाटील,यांनी परीक्षण केले. तर  मोनिका जोशी, योगेश सुपेकर यांनी प्रास्ताविक केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन