प्रसिद्ध चित्रपट ‘लगान’चा फोटो शेअर करत, ‘या’ खेळाडूने केले अश्विनला ट्रोल 

लगान

मुंबई : क्रिकेटपटू वासिम जाफरने एक मजेदार मिम्स ट्विटर वर शेअर केले आहे. वासिमच्या या ट्विट वर मजेदार मिम्स देखील येत आहेत. वासिम जाफर सध्या सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह असतो. आणि ट्विटरच्या माध्यमातून तो आपली मतं मांडतो. सध्या वासिमचे  मजेदार मिम्स शेअर करून टिप्पणी करण्याची त्याची पद्धत चाहत्यांना फार आवडत आहे. नुकताच त्याने ट्विटरवर एक मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये त्याने भारताचा फिरकीपटू आर अश्विनला टॅग केले आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रीडा वेबसाईटने शनिवारी  21 नोव्हेंबर ट्विटर च्या माध्यमातून सर्व चाहत्यांना प्रश्न विचारला. त्यांनी विचारले की, “कोणत्याही खेळाडूचे व संघाचे नाव न घेता सांगा की तुम्हाला सर्वाधिक आवडलेला सामना कोणता?”

जाफरने या प्रश्नाचे मजेदार पद्धतीने उत्तर दिले. त्यावरच वासिमने बॉलीवूड मधील क्रिकेटवर आधारित अभिनेता आमिर खानच्या प्रसिद्ध चित्रपटा ‘लगान’चा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये विदेशी गोलंदाज ‘मंकडींग’ पद्धतीने भारतीय खेळाडूला बाद करत होता. या फोटोत जाफरने आर अश्विनला टॅग केले आहे. विशेष म्हणजे आर अश्विननेही जाफरच्या ट्विटवर उत्तर देत ‘वसिम भाई’ अशी कमेंट केली आहे. तसेच पुढे हसण्याचा इमोजी टाकला आहे.

महत्वाच्या बातम्या