शेअर बाजार निर्देशांकात ६४ अंकांची वाढ

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६४ अंकांची वाढ होऊन बाजार ३३ हजार ३१५ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १३ अंकांच्या वाढीसह १० हजार ३२२ वर बंद झाला. शेअर बाजाराच्या मिडकॅपच्या आणि स्मॉलकॅपच्या समभागांमध्येही आज घसरण पाहायला मिळाली.

मुंबई शेअर बाजाराच्या ३० समभागांवर आधारित असलेल्या निर्देशाकांत ६४ अंकांची वाढ होऊन बाजार ३३ हजार ३१५ वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ५० समभागांवर आधारित असलेला निर्देशांक १३ अंकांच्या वाढीसह १० हजार ३२२ वर बंद झाला. अरविंदो फार्मा, टाटा मोटर्स, एचपीसीएल, बॉश, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स डीव्हीआर, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि सन फार्मा कंपनीच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर, एसबीआय, एल ॲण्ड टी, एचयूएल, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा आणि आयसीआयसीआय बॅंक कंपनीच्या समभागांमध्ये वाढ पाहायला मिळाली.