fbpx

मुस्लिम समाज शुक्रवारी बॉम्बस्फोट करणार नाही, मालेगाव बॉम्बस्फोटावरून पवारांचा साध्वीवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या खासदार साध्वी यांच्या उमेदवारीच्या तिकीटावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली. बॉम्बस्फोटातील आरोपींना लोकसभेचे तिकीट देणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे असे पवार म्हणाले आहेत.

तसेच मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत पवार म्हणाले की, मुस्लिम समाजात शुक्रवार हा पवित्र मानला जातो. त्यामुळे शुक्रवारी मुस्लिम स्फोट घडवतील, असे मला वाटत नाही.

नेमके काय म्हणाले पवार

मुस्लिम समाजात शुक्रवार हा पवित्र मानला जातो. यादिवशी मुस्लिम स्फोट घडवतील, असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले. या प्रकरणात मुस्लिम तरुणांना अटक करण्यास मी आक्षेप घेतला होता. त्यानंतरच हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक केली, अशी माहिती पवार यांनी दिली आणि आता त्याच संसदेत अभिभाषणावेळी राष्ट्रपतींच्या समोर असतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान मालेगाव स्फोटासंदर्भात खटल्याच्या सुनावणीसाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर गेल्याच आठवड्यात एनआयए न्यायालयात हजेरी लावली होती. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भाजपच्या तिकिटावर भोपाळ लोकसभा मतदारसंनघातून निवडून आल्या आहेत.