‘पोरांनो ऑलम्पिक मेडल आलच पाहिजे’; शरद पवारांनी घेतले महाराष्ट्रातील आघाडीचे मल्ल दत्तक

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे क्रीडा क्षेत्रावरील प्रेम जगजाहीर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद असो कि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद या सर्वच क्रीडा प्रकारांत त्यांनी खेळाडूंना कायम प्रोत्साहन दिल्याच आपण पाहिलं आहे. आता यंदाचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत तसेच दुहेरी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान उत्कर्ष काळे या महाराष्ट्राच्या चार पैलवानांना शरद पवार यांनी दत्तक घेतले आहे. या मल्लांचा पुढील तीन वर्षांचा सर्व खर्च पवार यांच्याकडून केला जाणार आहे.

महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. मात्र आपले मल्ल जागतिक आणि ऑलम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये कुठेतरी कमी पडत असल्याच दिसत. ऑलिंपिक मल्ल बनायचे असेल तर बाहेरच्या देशात जावे लागते याचा खर्च सामान्यांना परवडणारा नाही. मात्र आता या चारही पैलवानांच्या बाहेर देशातील प्रशिक्षण, खुराक, राहणे या सर्वाचा खर्च स्वतः शरद पवार करणार आहेत. दरम्यान या पैलवानांनी देशासाठी मेडल आणायलाच हव हि इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

राजकारण असो कि समाजकारण ज्या ठिकाणी शरद पवार हे लक्ष देतात ती गोष्ठ यशस्वी होते हा इतिहास आहे. त्यामुळे आता नक्कीच आपले मल्ल जागतिक स्पर्धादेखील जिंकतील याचा विश्वास कुस्तीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.