शरदराव तुम्ही फुटीरतावादी लोकांसोबत शोभत नाहीत : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : आज महायुतीची प्रचारसभा लातूरमधील औसा येथे पार पडली. या युती सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर चांगलेच शरसंधान साधले पण त्याच बरोबर त्यांनी कॉंग्रेसला वेठीस धरून पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली.

काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान बनावा या विचाराच्या बाजुने काँग्रेस आहे. काँग्रेसने देशाची फाळणी केली. नाहीतर पाकिस्तान झालाच नसता. काँग्रेस देशविरोधी गोष्टींचं समर्थन करते आहे. देशात दोन पंतप्रधानांची मागणी करणाऱ्यांना काँग्रेस पाठिंबा देते. या मुद्द्यावरून मोदिनी शरद पवार यांना हे शिब्त नाही असे म्हणत पवारांवर निशाणा साधला

Loading...

मोदी म्हणाले, ‘आज शरद पवार तुम्ही फुटीरतावादी लोकांसोबत उभे आहात ‘शरदराव तुम्हाला हे शोभतं का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले ‘राजकारण ही वेगळी गोष्ट आहे मात्र शरद पवार तिकडे शोभत नाहीत’. अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या अड्ड्यात घुसून मारण्याची भारताची नवी नीती आहे. दहशतवाद संपवूनच आम्ही थांबणार असल्याचेही मोदी म्हणाले.

दरम्यान, या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'