…अखेर शरद यादवांनी मागितली वसुंधराराजे यांची माफी

टीम महाराष्ट्र देशा – माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची अखेर माफी मागितली आहे. माझ्या शब्दांमुळे जर वसुंधरा राजे यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, याबाबत मी त्यांना एक पत्र देखील लिहिणार आहे. असे शरद यादव यांनी सांगितले आहे.

शरद यादव काय म्हटले होते –
शरद यादव यांनी राजस्थानच्या निवडणुकाच्या प्रचारात अलवर येथे बोलताना, वसुंधराराजेंना आता आराम करू द्या. त्या खूप थकल्या आहेत. वसुंधराराजे खूप जाड झाल्या आहेत. पूर्वी त्या खूप बारीक होत्या, असे वक्तव्य केले होते.

वसुंधरा राजे यांचे निवडणूक आयोगाला आवाहन –
शरद यादव यांची टिप्पणी एका महिलेसाठी लज्जास्पद आहे. त्यांचा हा दृष्टिकोन सर्व महिलांसाठी अपमानकारक आहे. तसेच, ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे, अशी तक्रार निवडणुक आयोगाकडे वसुंधरा राजे यांनी केली होती.

खासदार उदयनराजेंचे पंख कापण्याचे शरद पवारांचे संकेत

You might also like
Comments
Loading...