महाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही : शरद सोनवणे

पुणे : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यावेळी मनसेच्या मंचावरून गेल्या काही दिवसंपासून गायब असणारे एकमेव आमदार शरद सोनवणे हे प्रकाटले. आज मनसेच्यावतिने  पुण्यात गुरुपौर्णिमा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होत.यावेळी बोलताना शरद सोनवणे यांनी आपण मनसेचे निष्ठावंत असल्याचं सांगत पोटात आमच्या पाप नाही अन महाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही असा छातीठोक पणे दावा केला आहे.

मनसेच्या खळखट्याकला यश ; मल्टीप्लेक्स चालक नरमले !

तर मला कोणी तिकीट देत नव्हतंं तेव्हा मला एका दिलेर माणसाने तिकीट दिले त्याच नाव आहे राज ठाकरे असल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे आता शरद सोनवणे मनसे पासून दुरावलेल्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन, मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस (विशेष जवाबदारी – जनसंघटना, प्रचार-प्रसार व अतिरीक्त कारभार पिंपरी-चिंचवड) पदाची जबाबदारी माजी नगरसेवक तसेच गटनेते अॅड.किशोर शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली आहे.

किशोर शिंदे हे मनसेचे पुण्यातील माजी नगरसेवक तसेच गटनेते होते. ते राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याचे म्हंटले जाते. आता किशोर शिंदे यांच्यावर पक्ष संघटनाची मोठी जबाबदारी असणार आहे.

मराठा आरक्षणासाठी विष पिलेल्या जगन्नाथ सोनावणेंचा मृत्यु, आरक्षणासाठी राज्यात दुसरा बळी

कुठे गेले ‘राणेंचे’ ते कार्यकर्ते