भीमा कोरेगाव आणि वढू परिसरातील घटनांना हिंदुत्ववादी संघटना जबाबदार – शरद पवार

पुणे: वढू बुद्रूक येथे चार दिवसांपुर्वी, तर सोमवारी भीमा कोरेगाव, पेरणेफाटा, सणसवाडी येथे दंगलसदृश्य परिस्थिती होती,या सगळ्या प्रकारासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरलं आहे. भीमा कोरेगाव आणि वढू परिसरातील घटनांना पुण्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांची चिथावणी कारणीभूत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. यासाठी त्यांनी वढू ग्रामस्थांचा हवाला दिला आहे.

भीमा कोरेगावच्या लढाईला 200 वर्षे झाल्यानिमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन-चार दिवसांपासून चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगत आहेत.’ असे पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. शरद पवार यांचे हे ट्वीट ट्रोल होत असून शरद पवार हे राजकारण करत असल्याचा आरोप ट्वीटकऱ्यांनी केला आहे.