अयोध्येच्या महत्वपूर्ण निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा : सुप्रीम कोर्टाच्या निकालाच पवारांनी स्वागत केले आहे. तसेच जनेतेला शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन यावेळी शरद पवारांनी केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी पवारांना सत्ता स्थापनेबाबत विचारले असता पवार म्हणाले, जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असे पवार यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे देखील पवार म्हणाले.

तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद खटला प्रकरणी आज अंतिम निर्णयाचे वाचन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांचे खंडपीठ सकाळी साडेदहा वाजल्यापासून या खटल्याल्याच्या निर्णयाचे वाचन करीत होते.

दरम्यान, आजच्या निकालामुळे सर्वसामान्य देशवासीयांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला. एकीकडे शेकडो वर्षांपासून असलेल्या हिंदूंच्या आस्था जपल्या तर दुसरीकडे मुस्लिम समाजालाही न्याय दिला असं खा. संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या