‘साताऱ्यात गुलाल उधळायलाचं मला बोलवा’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. अनेक नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी ते बोलताना पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा, असं आवाहन कार्यकर्त्यांना केले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज आग्र्याला गेले. पण औरंगजेबांच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आता…? असा टोला शरद पवार यांनी उदयनराजे यांना लगावला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे त्यांचा प्रवेश झाला.

महत्वाच्या बातम्या