मतदारांचा कल पाहता शिवसेनेच्या जागा होणार कमी – शरद पवार

blank

खुलताबाद: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भा.ज.पा.शिवाय पर्यायच नसल्याने त्यांनी युती केली असली तरी, निवडणुकीतील मतदारांचा कल पाहता शिवसेनेच्या जागा कमी होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेरुळ येथे सोमवारी ( ता.14) एका पञकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीअंतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार हे राज्यभर फिरत असुन,औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे पवार यांची प्रचार सभा असुन, तत्पुर्वी पवार यांनी वेरुळ येथील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी होते.

यावेळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्जीकल स्ट्राईक,काश्मीरचे कलम 370 हे मुद्दे प्रभावीपणे जनतेसमोर मांडल्याने त्यांना यश मिळाले,माञ राज्याची निवडणुक वेगळी असते, अन मुद्देही वेगळे असतात.आम्ही राजकारण करतांना व्यक्तीगत करीत नाही,आमच राजकारण राजकीय स्वरुपाच असतं,आमच्या मनात कोणाविषयी द्वेष नाही,पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेले संबंध चांगले असुन,या पक्षाचे इतर नेते जबाबदारीच भान सोडुन बोलतात,पंतप्रधान होवुन गेलेल्या व्यक्ती वर टिका टिप्पणी करतांना त्यांच्या पदाची प्रतिष्ठा राखत नाहीत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्दे,शेतकरयांच्या आत्महत्त्या, शेती विषयक धोरण हे प्रचाराचे मुद्दे न करता भा.ज.पा.काश्मीरच्या 370 कलमाचा गवगवा करीत आहे,राज्यात कॉंग्रेस पक्ष कमजोर झाला असुन,आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच मुख्य प्रतिस्पर्धी बनल्याने आपल्या पक्षाला टिकेचं लक्ष बनविलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या