मोदींच्या सभेत कांदा फेकले जाण्याची शक्यता म्हणून कांदा विक्री बंदी : शरद पवार

नांदेड : नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहेत. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. मोदी यांच्या सभेत कांदा फेकले जाण्याची शक्यता यामुळे सरकार घाबरले आहेत गेल्या चार दिवसापासून कांदा व्यापाऱ्यांना विक्री बंद करण्याचे सांगण्यात आले आहेत. ही एक प्रकारची दडपशाही असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

पवार म्हणाले, लोकशाहीत सर्वसामान्यांना आंदोलनाचा अधिकार तुम्ही काढून घेत आहात हे सरकार कांद्याला पण घाबरत आहेत तुम्ही पाकिस्तानला असं करू तसं करू अशी भाषा करतात साधी कांद्याचं तरी निस्तरा असाही टोला पवार यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी बंद पडलेल्या उद्योगाची आकडेवरी सांगावे

पवार म्हणाले, पाच वर्षे यांच्या पक्षात ची दिल्लीत सत्ता आहे तेथे पुन्हा सत्ता आली आणि त्यांच्या यात्रेतील सर्वाधिक टीका माझ्यावर करतात ही फार गमतीची गोष्ट आहेत राज्यात परिस्थिती खूप बिकट आहे. मुख्यमंत्री राज्यात मोठी गुंतवणूक आल्याचे व कारखाने आल्याची दावा करतात त्यांनी गेल्या काही महिन्यात किती कारखाने बंद झाले आहे, याची आकडेवारी जाहीर करावी कारखाने किती सुरू झाले हे सांगावे. हे सोडाच किती जणांच्या हाताला काम मिळाले हे त्यांनी जाहीर करावेत. अर्थात यांच्याकडे आकडेवारी नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे कारखानदार उद्ध्वस्त झाला आहे यासाठी त्यांनी काय केले हेही सांगावेत असेही पवार म्हणाले.