‘राजकीय स्वार्थासाठी सरसकट हिंदूंनाच दहशतवादी ठरवलं जातंय’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील मतदारसंघांसाठी सध्या प्रचार सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यामध्ये आता स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य करत अभिनेता कमल हसनने खळबळ उडवली आहे.

Loading...

तमिळनाडूमधील अरावाकुरुची येथे आयोजित सभेत बोलताना कमल हसन म्हणाले की, सभेसाठी मुस्लीम समुदायाची जास्त गर्दी असल्याने नाही तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उभा राहून बोलतो, की स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे  आहे असं ते म्हणाले.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील कलम हसन यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा ऊल्लेख करतोय तेही जाहिरपणे. आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘नथूराम गोडसे यांनीच गांधीजींचा खून केला. हे चूक की बरोबर यावर लाखो मत मांडली गेली. चर्चा झाल्या. पण म्हणून सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवल जातंय. हे वक्तव्य करणाऱ्या कमल हासनचा मी निषेध करतो.’ अशी तीव्र नाराजी शरद पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दर्शवली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे शरद पोंक्षे यांनी ?

दहशतवादाला धर्म नसतो अगदीच मान्य.पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लिम असतो हे जगातलंं वास्तव. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. ईतिहास साक्ष आहे की हिंदू नी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत.आक्रमणं केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कूठे रहात असतील तर ते हिन्दूस्थानात. आणि हे कित्येक मुसलमानांच मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा ऊल्लेख करतोय तेही जाहिरपणे. आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा.

आता नथूराम गोडसे ह्याने गांधीचा खून केला. ह्यावर चूक बरोबर ह्यावर लाखो मत मांडली गेली. चर्चा झाल्या. पण म्हणून सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवल जातय. हे वक्तव्य करणाऱ्या  कमल हसन चा मी तीव्र विरोध निषेध करतो. आपल्या ला पटल तर तूम्ही ही करा. हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे.ता.क. तथाकथित पुरोगामिंनीही  निषेध करायला हरकत नाही.
धन्यवाद.
शरद पोंक्षे.







Loading…










Loading…

Loading...