‘कर्करोगाशी झुंज देताना सावरकरांची ‘जन्मठेप’वाचून प्रेरणा मिळाली’

टीम महाराष्ट्र देशा- कर्करोगाशी झुंज देताना सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचून प्रेरणा मिळाल्याचं अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितलं आहे . गेल्या डिसेंबरपासून ते कर्करोगानं ते त्रस्त होते. अखेर औषधोपचार आणि किमोथेरपीनं त्यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. ‘हिमालयाची सावली’ या नाटकात ते दिसणार आहेत.

यावेळी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, ‘हा काळ फार भयंकर होता. कारण मी २५ वर्षांत एकही दिवस रजा न घेता काम केलंय. सगळे दिवस व्यापलेले होते. अशा व्यक्तीला पहिले तीन महिने तर उंबरठाही ओलांडायचं नव्हतं. त्यामुळे हे सगळं फार भयंकर होतं. पण अशा वेळी ‘जन्मठेप’ परत एकदा वाचावंसं वाटलं. अकरा वर्ष एका छोट्या खोलीत साखळदंडाने बांधलेला माणूस आपल्या देशासाठी एवढं काही करू शकतो, तर मला तर फक्त सहा महिने त्रासातून काढायचे होते.’