शरद पवारांची भेट यशस्वी, ‘तेरणा’सह ‘तुळजाभवानी’ला मिळाली मदत

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर आता तेरणासह तुळजाभवानी आणि नृसिंह सहकारी कारखानाच्या कर्जापोटी जिल्हा बँकेला शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये मिळणार आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निधी देण्याचे मान्य केले आहे.

तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर, नरसिंह सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा २४ ऑगस्ट २०२० रोजी १५२ कोटींचा प्रस्ताव साखर आयुक्तांना पाठविण्यात आला होता. शासकीय थकहमीचा प्रस्ताव आल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी गायकवाड यांची खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी भेट घेतली होती.

या भेटीमध्ये तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याची विनंती केली गेली. त्यानंतर तो प्रस्ताव सहकार कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, खा.निंबाळकर, कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची या प्रकरणी भेट घेतली. तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली. यावर शरद पवारांना तो प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार व्हावा असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कळवले होते.

त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचीही शिष्टमंडळाने भेट घेत हा प्रस्ताव मंजुर करण्याची विनंती केली. यानंतर पवार यांनी या थकहमीपोटी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. याबाबत खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP