शरद पवार यांचे दोन्ही नातू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

ncp supremo sharad pawar, rohit pawar and parth pawar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पार्थ पवार आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तर याबाबत खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहणे औत्सुक्तच ठरणार आहे.

शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आधीच कर्जत जामखेड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात पार्थ पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. तर विधानसभेत उभे राहायचं की नाही याबाबत पार्थ स्वतः निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी म्हंटल आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर कर्जत जामखेडच्या नागरिकांनी रोहित पवार यांच्या उमेदवारीची शरद पवारांकडे मागणी केली आहे. त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून रोहित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र आता पार्थ पवार देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.