शरद पवारांनी शिवसेना आणि आघाडीबाबत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत- कॉंग्रेस

मुंबई: शरद पवारांच्या शिवसेना आणि आघाडीबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र आल्यास भाजपचा पाडाव करणं शक्य आहे, असे पवार यांनी रविवारी हल्लाबोल सभेत केले.

अशोक चव्हाण म्हणाले, “शिवसेनेसोबतच्या आघाडीसाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद आहेत. शिवसेनेचा अजेंडा वेगळा आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणलं पाहिजे. त्यामुळे त्याबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल. शरद पवार यांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक मत असेल. याबाबत सर्व प्रमुख एकत्र बसतील तेव्हा चर्चा होईल”

शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असे शरद पवार म्हणाले होते. मात्र हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधी पक्ष शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.