राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल आम्ही त्याच्या सोबत आहोत- पवार

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आणि माझ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अनेक वेळा मतभेत झाले आहेत. सध्या आम्ही दोघेही सत्तेत नाही. मात्र त्यांनी मुंबईत संविधान बचाओ रॅली काढल्यावर मी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल त्याच्या सोबत आम्ही आहोत, असं वक्तव्य करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीची आगामी काळात राजकारणात कोणती दिशा असेल याबद्दल सूचक विधान केलं आहे. लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण समारंभात पवार बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कारांच्या वितरण समारंभात पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रांतील सन्माननीय ज्येष्ठ समाजधुरिणांचा सन्मान करण्याची संधी प्राप्त झाली हा मी माझा बहुमान समजतो. कोल्हापूरकरांशीही या निमित्ताने हितगुज करता आलं. pic.twitter.com/p3tXfWxT5m
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 10, 2018
शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात मी कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून केली आहे. कारण कोल्हापुरात ज्या गोष्टींची सुरुवात होते त्या देशभरात पोहचतात’
- शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आणि माझ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अनेक वेळा मतभेत झाले आहेत. सध्या आम्ही दोघेही सत्तेत नाही. मात्र त्यांनी मुंबईत संविधान बचाओ रॅली काढल्यावर मी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल त्याच्या सोबत आम्ही आहोत, असं शरद पवार यांनी सांगितलं.
- माझ्या मनात काय चालले आहे ते पक्षातील सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती असतं