मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान,या सर्व प्रकरणावर खा. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी साधलेल्या संवादात आपली स्पष्ट केली.
मुख्यमंत्री निर्णय घेण्याआधी धनंजय मुंडेंबाबत पक्षच निर्णय घेईल. मुंडेवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं नंतर बघू असं वक्तव्य पवारांनी आज केलं. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय होईल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही. या निर्णयात कुणावर अन्याय होणार नाही हे पाहणं अधिक महत्त्वाचं असल्याचंही पवारांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करत आपली भूमिका मांडली. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे आणि दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगा नुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा
- पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ठरणार धनंजय मुंडे यांचे भवितव्य ?
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- ‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’