पूरग्रस्तांना १०-१५ हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना घेऊन घरे बांधून द्या : शरद पवार

सांगली : लोकांना महापुरामुळे होत असलेला त्रास सांगणे म्हणजे राजकारण नव्हे, असे सांगत पूरग्रस्तांना १०-१५ हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन घरे बांधून द्यायला हवीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी सायंकाळी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितले.

पलूस तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागाला भेटी दिल्यानंतर सायंकाळी सांगलीत त्यांनी पहाणी केली. पवार म्हणाले की, पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल, पण त्यानंतर काय?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, संवेदनशील मुद्य्यांचे राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पवारांनी सेल्फीकिंग मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.काही जण तर सेल्फी काढण्यासाठी जात असतील, तर ही स्थिती लवकर ठीक होईल, असं मला वाटत नाही, अशा शब्दात पवार यांनी महाजनांचं नाव न घेता टीका केली.

Loading...

राज्यात पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं पाणी ओसरायला सुरुवात झाली असून, मदत आणि बचावकार्य सुरु आहे. राज्य सरकार तसंच विविध स्वयंसेवी संस्था पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करत आहेत. सहा दिवस बंद असलेल्या पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आज एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आणि दक्षिण भारताला जोडणारी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अद्यापही विस्कळीत आहे. मात्र रुकडी गावाजवळ रूळ खराब झाल्यामुळे कोल्हापूर-मिरज मार्गावरील रेल्वे वाहतूक आठवडाभर बंद राहणार आहे. रस्तेमार्ग बंद असल्यामुळे लोकांचा प्रवासही थांबला होता आता पाणी उतरेल तसे हळूहळू हे मार्ग वाहतुकीसाठी खुले होत आहेत.

दरम्यान,महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांमधल्या कुटुंबांना रोखीने पाच हजार रुपये अर्थसहाय्य तातडीनं वितरीत करावं, तसंच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन राज्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. या जिल्ह्यांमधल्या पाणीपुरवठ्याच्या नादुरुस्त योजना तातडीनं दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा, बाधित गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्यानं हाती घेण्यासोबतच रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत व्हावं, यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून सत्तर तालुके आणि ७६१ गावं बाधित झाली आहेत. चार लाख ४७ हजार ६९५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे

महत्वाच्या बातम्या 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?