शरद पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल : प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

टीम महाराष्ट्र देशा: विरोधी पक्षांनी भाजप विरोधी कंबर कसली आहे. प्रजासत्ताक दिनी सर्वपक्षीय संविधान आंदोलन करून समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा विचार सुरु आहे.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व पक्षांनी भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. मात्र यामध्ये भारिप चे प्रकाश आंबेडकर यांचा फारसा सहभाग दिसला नाही. कोरेगाव भीमा प्रकरणापासून थेट भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या राजकीय चारित्र्यावरच शंका निर्माण केली आहे. अहमदनगरला ते राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्त माध्यमांशी आंबेडकर बोलत होते.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

राष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्याला महत्व आहे. शरद पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल. चारित्र्य नसल्यास काहीच साध्य करु शकत नाही .राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला नसता तर शिवसेना भाजपाबरोबर गेली नसती. तसेच हिंदू संघटनांत नियंत्रित आणि अनियंत्रित संघटना असून अनियंत्रित संघटनांचा त्रास सर्व हिंदूंना होत आहे. या संघटनांत वर्चस्वाची लढाई सुरु झाली असून करणी सेनाही त्यातीलच एक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कोंबिंग ऑपरेशन करावं, अशी मागणी त्यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, तर भिडे गुरुजी आणि पीएमओ कार्यालयाचा संबंध उघड करण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला. याबाबत आपल्याकडे ऑडिओ, व्हिडीओ आणि कागदोपत्री पुरावे असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.Loading…


Loading…

Loading...