पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली शरद पवारांच्या पत्राची दखल

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातला साखर उद्योग अडचणीत सापडल्यामुळे पत्र लिहिले होते. या पत्राची त्वरित दखल घेत. नरेंद्र मोदी यांनी एक समिती नेमली असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या समितीमध्ये नितीन गडकरी या समितीचे अध्यक्ष आहेत, तर या समितीत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि रामविलास पासवान यांचाही समावेश आहे.

शरद पवार कोल्हापूरमध्ये बोलत असतांना म्हणाले, इंधन दरवाढ झाली असतानाही इथेनॉल दर वाढलेले नाहीत. त्यामुळं इथेनॉलचे दर वाढवावेत. तसेच केंद्र सरकारन साखरेची निर्यात वाढवावी. देशातील ६० टक्के साखर ही पेय आणि मिठाई तयार करणाऱ्या कंपन्या वापरतात त्यांच्यावर सेस बसवावा बफर स्टॉकची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी. अश्या सूचना शरद पवार यांनी समितीचे अध्यक्ष नितीन गडकरींना केल्या आहेत.

You might also like
Comments
Loading...