उत्तर प्रदेशात भाजपला रोखण्याचा शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला

उत्तर प्रदेशात भाजपला रोखण्याचा शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला

मुंबई : उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पर्स्व्भूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष वेगवेगळी रणनीती आखताना दिसून येत आहेत यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काय रणनीती असावी यावर आज भाष्य केले आहे,

शरद पवार यांची आज मुंबई मध्ये पत्रकार परिषद पार पडली. यात ते म्हणाले, उत्तर प्रदेश मध्ये पुढील सहा महिन्यावर निवडणुका आल्या असतांना शरद पवार यांनी लखीमपुर प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन करायचे असेल तर जो भाजप विरोधी पक्ष तिथे सर्वात ताकदवान आहे, त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, अशी आमची भूमिका आहे असेही शरद पवार म्हणाले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना आम्ही समर्थन देत आहोत. आम्हाला जागा कमी मिळाल्या तरी भाजपच्या पराभवात खोडा न घालण्याची आमची भूमिका आहे असेही शरद पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली.

दरम्यान, त्यांनी यावेळी भात-चीन सीमा प्रश्नावर देखील आपली भुमीका मांडली. ते म्हणाले, देशाच्या सीमेचा थोडाबहुत अभ्यास आहे. गेले काही महिने चीनसोबत आपली चर्चा सुरु आहे. काल त्यांची १३ वी बैठक झाली. ती अपयशी ठरल्याची माहिती आहे. एका बाजुला चीनशी संवाद अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सतत घडतंय हे चिंताजनक आहे.यावर राजकारण न आणता एकत्र बसून सर्व राजकीय पक्षांनी सामूहिक भूमिका घेण्याची गरज आहे असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या