शरद पवार यांची मुलाखत 3 ऐवजी 6 जानेवारीला

पुणे : पुण्यात जागतिक मराठी अकादमीतर्फे ‘शोध मराठी मनाचा’ हे 15 वे जागतिक संमेलन 1, 2 आणि 3 जानेवारी 2018 रोजी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुलाखत 3 एेवजी 6 जानेवारी 2018 रोजी होणार असल्याचे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत विकास ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर यांनी कळविले आहे.

1, 2 आणि 3 जानेवारी 2018 रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनाचा समारोप देखील 3 जानेवारी 2018 रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथेच होणार आहे. या संमेलनातील इतर सर्व कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत.

bagdure

मात्र, संसदेचे कामकाज आणि शरद पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवार 6 जानेवारी 2018 रोजी, संध्याकाळी पाच वाजता बृह्न महाराष्ट्र काॅलेज आॅफ काॅमर्स (बीएमसीसी), डेक्कन, पुणे येथे होणार आहे. यापूर्वी नियोजन केल्याप्रमाणे मुक्त संवाद…. दोन पिढ्यांचा या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत.

या मुलाखतीसाठीच्या प्रवेशिका शनिवार 30 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे उपलब्ध होणार आहेत, असेही रामदास फुटाणे, हणमंतराव गायकवाड आणि सचिन ईटकर यांनी कळविले आहे.

You might also like
Comments
Loading...