ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्य्यांसह राज्यातील इतर प्रश्नांवरून या भेटीमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर चर्चा रंगली ते मोदी-ठाकरेंच्या एकांतात भेटीची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्वतः पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुमारे ३० मिनिटे या दोन्ही नेत्यांची वैयक्तिक भेट झाल्याचे समोर आले,

याभेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण देखील सांगितली आहे. ‘शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे,’ असं म्हणत त्यांनी या भेटीवरून तर्क-वितर्क लावणाऱ्यांच्या चर्चांना चोख उत्तरं दिलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही.’

महत्वाच्या बातम्या

IMP