Share

Sharad Pawar | “…ते दुर्देवी आहे” ; ठाकरे – शिंदेंच्या मेळाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई : काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. राज्याच्या इतिहासात काल पहिल्यांदा शिवसेना (Shivsena) पक्षाचे दोन दसरा मेळावे झाले. दसरा मेळावा पार पडला तरी आजही याची चर्चा कमी झालेली नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया :

पक्षात दोन गट पडणे, संघर्ष होणे हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही, मात्र संघर्षालाही मर्यादा असते, ती ठेवली पाहिजे असं म्हणत सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरू आहे, ते दुर्देवी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दसरा मेळाव्यात शिंदे – ठाकरे यांनी एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नये, ते राज्याच्या दृष्टीने चांगलं होणार नाही, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्या पुर्वी देखील शरद पवारांनी शिंदे आणि ठाकरेंची कान टोचले होते. एका पक्षाचे दोन भाग झाले आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चालवलं गेलं, या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नासल्याच शरद पवार यांनी म्हटल आहे.

राज्यात जबाबदार लोक आहेत, त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकायला हवीत आणि ही पावलं टाकण्याची जबाबदारी आमच्या सारख्या सिनियर लोकांवर असेल, त्यापेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे, यातून अपेक्षा अशी करूया की, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल, असं देखील शरद पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांबाबत देखील भाष्य केलं आहे. शिवसेना आमदार रमेश लाटके यांच्या निधनामुळे अंधेरीतील जागेसाठी निवडणुका होणार आहेत, यामध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा उद्धव ठाकरेंनाच असेल, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. राज्याच्या इतिहासात काल …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now