fbpx

‘आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबाची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये’

dhananjay munde and narendra modi

टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केली होती. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गृहकलह सुरु असून अजित पवार यांनी शरद पवार यांना हिटविकेट केलं आहे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला होता. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य करणाऱ्या मोदींवर जोरदार टीका केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेतून शरद पवार यांच्या कुटुंबात असलेल्या कलहाचा उल्लेख करून पवार कुटुंबियांना टार्गेट केले. पवार कुटुंबीयांवर टीका केल्याने चिडलेल्या धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून मोदींवर टीकास्त्र सोडले. प्रत्युत्तर दिले आहे.”आदरणीय शरद पवार यांच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. गडकरी यांनी पंतप्रधानांबद्दल काही दिवसांपूर्वी काय वक्तव्य केले हे सर्वज्ञात आहे. आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधानांनी काय स्थिती करून ठेवली आहे याकडे प्रथम लक्ष द्यावे.”असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.