करमाळ्यावर शरद पवारांचे थेट लक्ष, रश्मी बागल यांना दिला भरघोस निधी

कुर्डूवाडी/हर्षल बागल : 2014 साली करमाळा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला झालेल्या दग्या फटाक्यांमुळे चांगलाच गाजला. ऐनवेळी राष्ट्रवादीचे आ.बबनराव शिंदे यांचे बंधु संजय शिंदे यांनी करमाळ्यातुन निवडणुक लढवली त्यामुळे राष्ट्रवादीची हक्काची जागा रश्मी बागल यांच्या रुपाने हातातुन गेली. परिणामी संजय शिंदे व रश्मी बागल यांचे पराभव झाले तर सेनेचे नारायण पाटिल निवडणुन आले. त्यानंतर रश्मी बागल यांच्या पाठिशी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा खा.शरद पवार भक्कमपणे ऊभा असल्याचे चित्र आहे.

आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.

रश्मी बागल यांच्या करमाळा मतदार संघात शरद पवार यांनी त्यांच्या खासदार फडांतुन कव्हे ( 7 लाख ) , रोपळे (1.5 लाख) महादेव वाडी(7 लाख) या तीन गावासांठी तब्बल एकुण 16.5 लाखांचा निधी दिला आहे. यामुळे रश्मी बागल यांना दिलासा मिळाला तर संजय शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. या निधीची मागणी काही दिवसापुर्वी रश्मी बागल यांनी केली होती.

माढा विधानसभेतुन 36 गावे 2009 पासुन करमाळ्याला जोडली आहेत. कव्हे , रोपळे ,महादेव वाडी आजही शिंदे गटाच्याच बाजूने आहेत. त्याच गावात खा. शरद पवारांनी थेट निधी दिल्याने रश्मी बागल यांचे बलस्थान वाढले आहे. कव्हे ग्राम पचायंत बागल गटाकडे आहे. 36 गावात आगामी काळात खा. शरद पवार हे स्वतः निधी देणार असल्याने रश्मी बागल यांना याचा थेट फायदा होणार आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याची आदिनाथ साखर कारखान्याच्या सुपरवाझरला मारहाण

 राष्ट्रवादीचे आ.बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीकडून आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर…