औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार यांच्यावर दानवे यांनी टीका केलीय. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे कान पकडले पाहिजेत. शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, अशा शब्दात दानवे यांनी शरद पवारांवर सडेतोड टीका केली.
तसेच रावसाहेब दानवे म्हणाले, “ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. बाहेर पडावे आणि काम करावं, असं दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी. पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शरद पवार यांनी काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजेत पण शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे”, अशी खोचक टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
संजय राऊतांवर टीकास्त्र –
आमचा रंग ओरिजिनल आहे, रंग कुणाचा चांगला आहे, हे निवडणुकीत ठरतं, शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्ह त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली आमचं सरकार येणार आहे, आणि पुढची 25 वर्षे आमचं सरकार टिकणार आहे, असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<