चंद्रकांत पाटील यांनी एकदा निवडणूक लढवावीच – शरद पवार

कोल्हापूर : आयुष्यात कधी संधी मिळाली नाही तरी, सकाळ –दुपार- संध्याकाळ संधी घेतली जाते. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकदा निवडणूक लढवावी, मग त्यांना समजेल असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

अर्थव्यवस्था अडचणीत आहे. शेतकऱ्यांपासून सगळेच अडचणीत आले आहेत. धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात, मात्र आता ते निर्णय कोल्हापूर या उपकेंद्रातून घेतले जात आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधरमतदार संघातून निवडून आलेले आहेत.