fbpx

औरंगाबादमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला शरद पवार यांचा वाढदिवस

ncp aurangabad

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागातर्फे दिनांक १२/१२/२०१७  रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक १२/१२/२०१७ रोजी जन्मलेल्या मुलींचे (बेबी किट) साहित्य, मिठाई, व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय (घाटी) रात्री 12 वाजेनंतर जन्मलेल्या 25 कन्यांचे राष्ट्रवादी तर्फे स्वागत करण्यात आले.

स्त्री शक्तीचा जागर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी शहराध्यक्ष गजानन सोनवणे यांनी केले होते या कार्यक्रमास सोशल मिडीया मराठवाडा चिटणीस जावेद खान, शहर जिल्हाध्यक्ष विलास मगरे, शहर उपाध्यक्ष अफरोज सय्यद, विद्यार्थी उपाध्यक्ष सुशिल बोर्डे, शहर चिटणीस आनंद मगरे, ओबीसी पूर्व अध्यक्ष चांगदेव हिंगे, चिटणीस अमित जगताप, गणेश आंबेकर, विजय जार्हाड, संदीप सराफ, निखिल जैवळ आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले…