तर राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा निघाला असता-पवार

sharad-pawar

मुंबई : ‘चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिरबाबत एक समिती बनवली होती. त्यात मी आणि भैरवसिंग शेखावत होतो. माझ्याकडे राम मंदिर न्यासशी चर्चा करण्याची जबाबदारी होती. तर शेखावत यांना बाबरी मस्जिद कृती समितीशी चर्चा करायला सांगितलं होतं. यामध्ये असा तोडगा निघाला होता की, पूर्ण जागेचं वाटप मंदिर आणि मशिदीमध्ये करायचं 65-66% जागा मंदिरासाठी आणि उरलेली मशिदीसाठी द्यायची. पण चंद्रशेखर यांचं सरकार पडलं आणि गोष्टी थांबल्या असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे .

सध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण हळूहळू तापायला सुरुवात होऊ लागली आहे तसेच आगामी काही दिवसात राम मंदिराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत या पार्श्वभूमीवर पवार यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

काय म्हणाले पवार ?

1990-91 मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिर बाबत एक समिती बनवली होती. या समितीनं वादावर तोडगा म्हणून मंदिर आणि मशिदीमध्ये जागेचं वाटप केलं होतं.त्यावेळी माझ्याकडे राम मंदिर न्यासशी चर्चा करण्याची जबाबदारी होती. तर शेखावत यांना बाबरी मस्जिद कृती समितीशी चर्चा करायला सांगितलं होतं. यामध्ये असा तोडगा निघाला होता की, पूर्ण जागेचं वाटप मंदिर आणि मशिदीमध्ये करायचं 65-66% जागा मंदिरासाठी आणि उरलेली मशिदीसाठी द्यायची. पण चंद्रशेखर यांचं सरकार पडलं आणि गोष्टी थांबल्या मात्र जर चंद्रशेखर यांचं सरकार पडलं नसतं तर 1990-91 मध्येच राम मंदिरबाबत ठोस तोडगा निघून योग्य ती कार्यवाही देखील झाली असती.