प्रशासनाने काळजी घेयला हवी होती; सर्वांनी शांतता बाळगण्याचे शरद पवार यांचे आवाहन

शरद पवार

मुंबई: भीमा कोरेगाव येथील घटनेला २०० वर्षपूर्ण होत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जनसागर येणार हे माहित होते. तसेच गेल्या दोन दिवसांपासुन तेथील वातावरणही अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती काळजी घेण गरजेच होत. मात्र आता हे प्रकरण वाढवू नये म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वाना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणीही या घटनेला जातीय रंग देवू नये तसेच राज्य सरकारनेही याची चौकशी करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

मागील अनेक वर्षापासून लोक भीमा कोरेगावला जातात, मात्र अशी घटना आजवर घडलेली नाही. यंदा २०० वर्षे निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल याची प्रशासनाला कल्पना होती. आपण वढू येथील गावकऱ्यांशी बोललो असून पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी वढू येथे येऊन चिथावणी दिल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. वढू येथे बाहेरून आलेल्या लोकांनी गोंधळ केला. अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या लोकांचा या घटनेशी काहीही संबंध नाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले.

काल भीमा कोरेगाव रणसंग्रामाच्या २०० व्या वर्षपूर्ती निमित्ताने विजय दिवस साजरा करण्यात आला. मोठ्या प्रमाणात नागरिक विजयस्थंभाला अभिवाद करण्यासाठी आले होते. मात्र सनसवाडी परिसरात दोन गटांमध्ये अचानक झालेल्या दगडफेकीत अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...