संकटावर मात करून मराठी माणसाची एकजूट दाखवून द्या : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. आज सातारा जिल्हयातील कराड–तांबवे गावाला भेट त्यांनी दिली. यावेळी बोलताना पवार यांनी ‘सर्वांनी एकी ठेवली पाहिजे. तसेच संकटावर सगळे एकत्र मिळून मात करू. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस संकटावर एकजुटीने मात करतो हे जगाला दाखवून देऊ’ अशा शब्दात राज्यातील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

पुढे बोलताना शरद पवार यांनी एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देण्याची ताकद एकट्या दुकटयाची नाही. राज्य आणि केंद्र सरकार मदतीला धावून यायला हवे. विविध संस्था, व्यक्तींनी मदतीचा हातभार लावायला हवा. तसेच राज्य व केंद्राकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असंही मत व्यक्त केले आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार यांनी एक महिन्याचा पगार व जमा झालेला ५० लाखाचा धनादेश आजच मुंबईत मुख्यमंत्री असतील तर तो देण्यात येईल. इतरांना सांगण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीने हा निर्णय घेतल्यामुळे पूरग्रस्तांना अजूनच मदत होणार आहे. तसेच अशाच प्रकारचा निर्णय इतरही पक्षातील नेत्यांनी घ्यायला पाहिजे.

दरम्यान, साज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे.