राणेंच्या भाजप प्रवेशाला शुभेच्छा; शरद पवार

sharad pawar

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान चंदकांत पाटील यांनी नारायण राणेंसाठी आपल मंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली होती पण मंत्री कोण असावा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात म्हणत सध्या सर्व घोषणा ह्या कोल्हापूर मधून होत असल्याच म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळाला असून २७ ऑगस्ट रोजी अमित शहांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होण्याची चर्चा आहे. राणे यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील राजकारणाची गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कॉंग्रेसकडून या बाबाद कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.