#महापूर : पूरग्रस्तांसाठी अर्ध्याचं तासात शरद पवारांनी जमवेल १ कोटी रुपये

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यावर जल आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. तर लष्करी यंत्रणेकडून देखील बचाव कार्य सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर – सांगलीतील आपत्तीग्रस्तांना मदतीची गरज आहे. शासनाकडून मदत होतचं आहे. तर आता बारामतीकरांनी देखील मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बारामतीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बैठक बोलवली होती. या बैठकीत बारामतीकरांनी अर्ध्याच तासात तब्बल एक कोटी रुपयांची रोख मदत उभी केली. विशेष म्हणजे या रोख रक्कमेशिवाय अन्नधान्य, कपडे, औषधांसह गरजेच्या वस्तूही पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ही मदत येत्या दोन दिवसात सांगली, कोल्हापूरसह विविध भागात पोहोचवली जाणार आहे.

Loading...

दरम्यान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून 50 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

आता काय माणसांचा जीव गेल्यावर सांगतो का ? अजित पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले

महाजनांची सेल्फी म्हणजे ‘निर्लज्जम सदासुखी आणि निर्लज्जपणाचा कळस’ : तृप्ती देसाई

कोल्हापूरसाठी वाट्टेल ती मदत करायला उतरलोय, खा संभाजीराजे धावले पूरग्रस्तांच्या मदतीला

#कोल्हापूर – सांगली महापूर : ढेपाळलेल्या यंत्रणेवरून संतप्त नागरिकांनी महाजनांना विचारला जाब

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती