शरद पवार मला हसून माफ करतील : सचिन अहिर

टीम महाराष्ट्र देशा :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच सचिन अहिर यांच्या धक्कादायक पक्षांतरानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळेस त्यांना शरद पवारांविषयी प्रश्न विचारणात आला. यावेळी त्यांनी ‘शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेन, तेही मला हसून माफ करतील. माझ्या पाठीवर थाप देतील, अस उत्तर सचिन अहिर यांनी दिल.

दरम्यान, शरद पवार की बाळासाहेब ठाकरे असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘निश्चितपणे मनात कोणताही किंतू-परंतु नाही, शरद पवार हे माझ्या हृदयात आहेत. तेच माझे आदर्श असतील. त्यांचा आशीर्वाद काल होता, आजही आहे, उद्याही ठेवा अस अहिर म्हणाले.