fbpx

कॉंग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचे अतिक्रमण, पुणे – सांगलीच्या जागा पवारांच्या मर्जीने ?

congress ncp

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. आजवर या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसकडून तगडी लढत दिली जायची. मात्र आजच्या घडीला पक्षाकडे सक्षम चेहऱ्याचा अभाव दिसून येतो. तर दुसरीकडे कॉंग्रेसची जागा असताना देखील दोन्ही ठिकाणी शरद पवार हे आपल्या मर्जीतील व्यक्तींना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

पश्चिम महाराष्ट्राला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आघाडीत या भागातील बहुतांश लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे राखले आहेत. तर पुणे आणि सांगलीची जागा कॉंग्रेसकडे आहे. पुण्यामध्ये आजवर माजी खा. सुरेश कलमाडी यांची कॉंग्रेसवर एकहाती पकड होती. मात्र राष्ट्रकुल घोटाळयातील जेलवारीनंतर ते राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसकडे सक्षम चेहऱ्याची कमतरता आहे.

कॉंग्रेसची परस्थिती पाहता शरद पवार यांनी दोन्ही मतदारसंघाची सूत्रे देखील आपल्या हातात घेतल्याचे चित्र आहे. आजवर भाजपचे सहयोगी खासदार म्हणून राहिलेले संजय काकडे यांना कॉंग्रेस प्रवेश करायला लावून उमेदवारी देण्यासाठी खुद्द श्री.पवार आग्रही दिसत आहेत. तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या रूपाने आणखीन एक पर्याय त्यांनी उभा केला आहे.

दरम्यान, पवार यांच्याकडून होत असलेल्या अतिक्रमणामुळे कॉंग्रेसच्या अंतर्गत गोटात मात्र नाराजीचा सूर आहे. त्यामुळे पुण्यातून आयात उमेदवार देण्यास कॉंग्रेस नेते विरोध करताना दिसत आहेत.

1 Comment

Click here to post a comment