अखेर शरद पवार माढ्यातूनच लढणार; रामराजे निंबाळकर यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी

टीम महाराष्ट्र देशा – अखेर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच निवडणूक लढणार असल्याचे समजते आहे. याबबत फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याची माहिती मिळत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील पवार यांच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे दिली असल्याचे ही कळते आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निंबाळकर यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी काल नवी दिल्ली येथे शरद पवारांची भेट घेतली होती. मोहिते पाटील यांचे समर्थक हे नाराज झाल्याची चर्चा होती. परंतु त्यांची समजूत कालच्या बैठकीत काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

फलटण, माण-खटाव या मतदार संघातील निंबाळकर यांना या खडानखडा माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह आमदार बबनदादा शिंदे, रश्मी बागल, शेकापचे आमदार गणपतराव पाटील हे मातब्बर नेते आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.