माढ्यातून लोकसभा लढवण्याचे खुद्द शरद पवारांकडून संकेत

पुणे : मला लोकसभेचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे. यावर आता निवडणूक लढण्याबाबत मी विचार करून ठरवेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार यांच्या या विधानामुळे ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आणखीनच प्रबळ झाली आहे. दरम्यान माढा लोकसभेचा उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला सस्पेंस आणखीनच वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यांमध्ये लढविण्यात येणाऱ्या लोकसभा जागांवर विचार विनिमय करण्यासाठी आज पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी माढा, शिरूर, जळगाव, नवी मुंबई, कोल्हापूर, उस्मानाबाद, ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपवर निशाणा साधला

Loading...

यापूर्वीच्या अनेक पंतप्रधानांची कार्यकाळ संपताना शेवटची भाषणे मी ऐकली आहेत. मात्र त्यामध्ये अभ्यास असायची. आजपर्यंतची जी सभेत आणि सुसंस्कृतपणाच्या परंपरेला हरताळ फसण्याचं काम मोदींनी केल्याची टीका शरद पवार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केलेले भाषण हे त्यांच्या संस्कृतीनुसार आहे. सध्या आमचे लक्ष हे केवळ लोकसभा निवडणुकांवर आहे, मात्र राज्यातील सरकारने मुदतीआधी विधानसभा बरखास्त केल्यास महाराष्ट्रातील जनतेला लवकर सुटका झाली याचा आनंद, असा टोला यावेळी पवार यांनी लगावला. दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शिरूरमधून लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे विधान केले होते. याबद्दल विचारले असता. आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघासाठी प्रबळ उमेदवार आहेत. त्यामुळे अजित दादांनी शिरूरला जाण्याची गरज नसल्याचं शरद पवार म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला