२०१९ ला शरद पवार होणार देशाचे पंतप्रधान

रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंतन बैठक होती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे 2019ला पंतप्रधान होऊ शकतात असं अप्रत्यक्ष वक्तव्य केलं आहे.
 
‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकतं.’ असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.