fbpx

‘राष्ट्रवादीचे १० खासदार निवडून आले तर शरद पवार पंतप्रधान होणार’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे रण चांगलेच तापले आहे. अशा या तापलेल्या वातावरणामुळे राजकीय नेत्यांकडून अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने शरद पवार पंतप्रधान होणार असे भाकीत केले आहे. मजीद मेमन या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याने हे भाकीत केले आहे. या लोकसभा निवडणुकीत जर राष्ट्रवादीचे १० खासदार निवडून आले तर देशाचे पंतप्रधान हे शरद पवार असतील. असे ते म्हणाले आहेत.

मजीद मेमन हे अकोल्यातील आघाडीचे लोकसभा उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारार्थ अकोल्यात आले असता त्यांनी हे भाकीत केले. यावेळी त्यांनी अकोल्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे सूचक विधान केले.

यावेळी मेमन म्हणाले की, सध्या आमच्या पक्षाकडे जास्त खासदार नाहीत. दुर्दैवाने आमचा पक्षही तेवढा मोठा नाही. पण, २-३ खासदार असलेले देवेगौडा या देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जर १० पेक्षा जास्त खासदार निवडूण आले तर आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास, शरद पवार यांचेच नाव आघाडीवर असेल.