शरद पवारांनी तयार केलेला पठ्या, त्यांच्याच विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरणार

टीम महाराष्ट्र देशा –  मोहळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबीत विद्यमान आमदार रमेश कदम यांना आता लोकसभेचे वेध लागले आहे. माढा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी कदम यांनी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कदम शिवसेनेच्या संपर्कात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि रमेश कदम यांच्यामध्ये दोन बैठका झाली असल्याची माहिती मिळत आहे. याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.

शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले आमदार रमेश कदम हे माढा लोकसभा मतदार संघातून त्यांच्याच विरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. माढा लोकसभा मतदार संघातून २००९ प्रमणे पुन्हा उभा राहणार असल्याचे संकेत खुद्द शरद पवार यांनीच दिले आहेत. तर दुसरीकडे कदम यांनी माढा लोकसभेसाठी शिवसेनेकडून फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे पवारांनी तयार केलेला पठ्या त्यांच्याच विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरणार अशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.

आमदार रमेश कदम सध्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारागृहात आहेत.सोलापूरसह राज्यभरात विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. २०१५मध्ये कदम यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून निलंबीत केले होते.

राष्ट्रवादीने निलंबीत केल्यापासून कदम शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेची निवडणूक जवळ आहे. कदम हे शिवसेनेकडून लोकसभेला इच्छुक आहेत.

कदम यांनी स्वत:हून शिवसेनेशी संपर्क केला आहे. शिवसेना पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने कदम यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. रमेश कदम हे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत.लोकसभेला भारतीय जनता पार्टीसोबत युती झाली नाही तर आमदार कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकेल. विधानसभा निवडणूकीसाठीही त्यांचा विचार केला जावू शकतो. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेक नेते राजकारणात आहेत. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेकडून जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत’, असे वानकर यांनी यावेळी सांगितले.

Loading...

“शिवसेनेकडून उमेदवारी नाही मिळाली तरी आमदार रमेश कदम हे शिवसैनिक म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत. या अनुषंगाने दोन बैठका झाल्या आहेत. मोहोळ मतदार संघातील शिवसैनिकांनी होकार दिला तर रमेश कदम यांच्याबाबत पक्षाकडून सकारात्मक विचार केला जाऊ शकतो.”

(गणेश वानकर – जिल्हाप्रमुख, शिवसेना)

Loading...

1 Comment

Click here to post a comment