मुंबई : काल राज्यसभेत कृषि विधेयकावरून गदारोळ पाहायला मिळाला. आज मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये ते म्हणाले कि, गदारोळ केलेल्या खासदारांना निलंबित केले गेले. त्यांचे म्हणणे सुद्धा ऐकून घेतले नाही. म्हणून सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण केलं. उपासभापतींनी उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं. आज सदस्यांनी अन्नत्याग केला. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. त्यांच्या अभियानात मी सहभागी होणार आहे,” असं शरद पवार म्हणाले
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- सतरा वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याचा लागणार निकाल, सुनील केदार यांच्या अडचणी वाढणा
- कोणतेही सुरक्षेची साधने नाहीत, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’च्या विरोधात होणार आंदोलन
- खामगावात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पालकमंत्र्यांनी दिले हे महत्वाचे निर्देश
- कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार, ऊर्जामंत्र्यांचे नागपूरकरांना आश्वासन
- शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डावः बाळासाहेब थोरात