पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बहुजनांचा इतिहास मोडून काढायचा आहे, मागे काही ठेवायचे नाही अशी त्यांची भूमिका आहे. असा जोरदार हल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केला. संबंध नसताना सांगलीत तुम्ही अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करता, जेजुरीत जाता पण वाफगावच्या किल्ल्याबाबत तुम्ही काही बोलत नाही, असा प्रश्न पडळकरांनी केला. ते पुण्यात बोलत होते.
आता किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही ताब्यात घेऊन जीर्णोद्धार करू, असा इशाराच गोपीचंद पडळकरांनी दिला. लोक वर्गणीच्या माध्यमातून आम्ही हा जीर्णोद्धार करू. मात्र या निमित्ताने शरद पवार आणि राज्य सरकारची नियत लक्षात आली, असे पडळकर म्हणाले. रयत शिक्षण संस्थेवरूनही पडळकर यांनी पवारांवर टीका केली.
वाफगाव यशवंतराव होळकरांचा किल्ला राज्य सरकारने ताब्यात घ्यावा. हा किल्ला सध्या रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. म्हणजेच बहुजनांचा इतिहास त्यांना मोडीत काढायचा आहे. एका बाजूला करायचे एक आणि दाखवायचे एक ही यांची भूमिका आहे. आता आम्हीच किल्ल्याचा जीर्णोद्धार करू, याविषयी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे पडळकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :