fbpx

पवारांचा दिलदारपणा : तिवरे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केली आर्थिक मदत

रत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटनेनंतर राजकीय आरोप – प्रत्यारोपांनी जोर पकडला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिवरे धरण घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्तांची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

यावेळी पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर फंडातून त्यांनी मृतांच्या ९ नातेवाईकांना प्रत्येकी एक लाखांची मदत केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.