तिवरे धरण दुर्घटनेस्थळी शरद पवार देणार भेट, जाणून घेणार दुर्घटनाग्रस्तांच्या व्यथा

टीम महाराष्ट्र देशा : तिवरे धरण दुर्घटनेनंतर राजकीय आरोप – प्रत्यारोपांनी जोर पकडला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिवरे धरण घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्तांची भेट घेणार आहेत.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिवरे धरण दुर्घटना घडली असल्याच समोर आल आहे. या दुर्घटनेमध्ये नाहक २३ जणांचा बळी गेला आहे.तर कुटुंबाच्या कुटुंब उधवस्त झाली आहेत. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त गावांमध्ये सरकार प्रती कमालीची नाराजी आहे.मात्र दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी १२ वाजता तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

दरम्यान या दुर्घटनेनंतर राज्याच्या जलसंधारण खात्याचे पितळ उघडले पडले आहे. तर जासंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यांमुळे धरण फुटले असल्याचा खुलासा केला आहे. यावरून विरोधकांनी सताधारी भाजपची खिल्ली उडवत फैलावर घेतले आहे.