शरद पवारांची अकलूज भेट मोहिते पाटलांना पुन्हा बळ देणार का ?

sharad-pawar ncp

विरेश आंधळकर: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या दौऱ्यावर असून विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते केला जाणार आहे. एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा असणारे माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंड अकलूजला पवार भेट देणार असल्याने या दौऱ्याला जिल्ह्याच्या राजकारण विशेष महत्व येताना दिसत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या सोबत असणाऱ्या मोहिते पाटील घराण्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर कायम दबदबा दिसून आला आहे. मात्र गेल्या काही काळापासून मोहिते पाटील घराण्याच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावण्याच कामही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधीलच नेत्यांनी केल्याच दिसत आहे. कधीकाळी जिल्हा बँक, दुध संघ, जिल्हा परिषदेच्या विविध पदांवर मोहिते पाटील घराण्याची व्यक्ती अथवा त्यांचे समर्थक असत. मात्र माळशिरस मतदार संघ आरक्षित झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांना आपला मतदार संघ बदलण्याची वेळ आली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या राजकारणामुळे दुखावला गेलेला मोठा गट राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तयार झालाच होता.

Loading...

आमदारकीसाठी संपूर्ण जोर लावूनही पंढरपूरमध्ये अपक्ष भारत भालके यांनी मोहिते पाटलांचा पराभव केला. हा पराभवच पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत विरोधकांना बळ देणारा ठरला. मात्र हे सर्व घडत असताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पावर यांची भूमिका एकाबाजूला मोहिते पाटीलांना सावरण्याची तर दुसरीकडे विरोधी गटाला प्रोत्साहन देण्याची असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकाणात कायम रंगत आली आहे. दरम्यानच्या काळात संजय शिंदे यांच्या सारख्या कट्टर अजित पवार समर्थकांनी बंड करत जिल्हा परिषदेवर अपक्ष असतानाही भाजपच्या मदतीने अध्यक्षपद मिळवल. हे सर्व होत असताना मोहिते पाटील हे मात्र पिछाडीवर पडल्याच दिसत आहे. यातूनच त्यांच्या भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या.

अंतर्गत राजकारणामुळे एकंदरीतच राष्ट्रवादीला फटका बसत असताना मात्र भाजपला याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे. जिथे भाजपचा नेता कोण आहे हे सापडणार नाही अशा भागातही आता नाराज राष्ट्रवादी कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसल्याने भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. संजय शिंदे यांच्या रूपाने भाजपला जिल्ह्याच चेहरा मिळत आहे. मात्र आजही शिंदे यांची पवार निष्ठा कमी झाल्याच दिसत नाही. त्यामुळे आज होणार शरद पवार यांचा दौरा एकंदरीतच जिल्ह्याचा राजकारणात नवीन अध्याय घेवून येणार का, अंतगर्त कलहामुळे पोखरत चाललेल्या राष्ट्रवादीचे डॅमेज कंट्रोल होणार का ? आणि सर्वात महत्वाच म्हण्ज्के मोहोते पाटील घराण्याचा पुन्हा राष्ट्रवादीवर वरचष्मा येणार का हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
शरद पवार सुरक्षा काढून घेतली ही अफवा,यामध्ये काही तथ्य नाही : अमृता फडणवीस